मराठी बातम्या ग्रूप जॉईन करा

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आनंदाची बातमी; कोण पात्र, किती शिष्यवृत्ती, अर्जाची प्रक्रिया – सविस्तर माहितीसाठी ही बातमी नक्की वाचा!

मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) मध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कामगार शिक्षण सहाय्य योजनेअंतर्गत २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती आणि उत्तेजनार्थ बक्षीस योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक आधार मिळणार आहे.

कोण पात्र?

या योजनेंतर्गत मार्च २०२५ मध्ये दहावी (SSC) किंवा तत्सम परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन किमान ६० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवलेल्या पाल्यांनाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे.
या योजनेत एसटीतील सर्व अधिकारी, नियमित, अर्धवेळ, रोजंदार कर्मचारी पात्र आहेत.

किती शिष्यवृत्ती?

  • एकूण ३५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
  • उर्वरित अर्जांमधून १०० विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारे उत्तेजनार्थ बक्षीस दिले जाणार आहे.
  • प्रत्येक विभागासाठी १० शिष्यवृत्तींची मर्यादा ठेवण्यात आली आहे.

अर्ज करताना काय आवश्यक?

  • दहावीची प्रमाणित गुणपत्रिका
  • पुढील वर्गासाठी घेतलेल्या प्रवेशाची प्रमाणित पावती
  • इतर बोर्ड (CBSE, ICSE, IB) असल्यास गुण रूपांतर साक्षांकित प्रत
  • अर्ज संबंधित विभाग नियंत्रकांमार्फत सादर करणे आवश्यक आहे.

प्रशासनाची भूमिका:

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांनी सर्व विभाग नियंत्रकांना या योजनेंतर्गत अर्ज गोळा करून वेळेत पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जर तुम्ही एसटीमध्ये कार्यरत असाल आणि तुमचा पाल्य पात्र असेल, तर ही सुवर्णसंधी दवडू नका. लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

Leave a Comment