खरीप 2024: 75 हजार शेतकऱ्यांना मिळणार 55 कोटींची नुकसानभरपाई!

मुंबई | प्रतिनिधी

खरीप हंगाम 2024 दरम्यान काढणीनंतर आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी राज्य शासनाच्या अंतिम हप्त्याच्या 1000 कोटींच्या निधी प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली आहे.

महत्त्वाचे ठळक मुद्दे:

  • 75,677 पात्र शेतकऱ्यांना मिळणार एकूण 55 कोटींची नुकसानभरपाई
  • पंचनाम्यानंतर पात्र शेतकऱ्यांची यादी निश्चित
  • प्रति हेक्टरी ₹6200 ते ₹8500 पर्यंत भरपाई मिळण्याची शक्यता
  • राज्य सरकारला मिळणार आहे ₹2300 कोटींचा परतावा, जो पुन्हा शेतकऱ्यांसाठीच वापरणार

कशी मिळणार भरपाई?

ज्या अधिसूचित क्षेत्रांमध्ये 25 टक्क्यांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या भागातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ₹6200 ते ₹6500 तर इतर मंडळांतील शेतकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक पंचनाम्यानुसार प्रति हेक्टरी ₹8000 ते ₹8500 पर्यंत नुकसानभरपाई मिळेल, अशी अपेक्षा आहे सरकारचा मोठा निर्णय!

राज्य सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत विमा कंपन्यांना दिलेल्या एकूण 7600 कोटींपैकी 2300 कोटींचा परतावा मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही रक्कम पुन्हा शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरण्याचा निर्णय घेतला गेला असून, ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *