दि. 9 जुलै 2025 | Portal News
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा उभारणारे आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारच्या दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत त्यांनी मुंबईत मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यभरात चर्चा रंगली असून, जरांगे पाटील सातत्यानं आंदोलकांच्या बाजूने आवाज उठवत आहेत. त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे की, जर शासकीय पातळीवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास, मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल.
ते म्हणाले, “हा शेवटचा इशारा आहे. जर आंदोलन पुन्हा झालं, तर याची जबाबदारी सरकारची असेल.” तसेच, ते पुढे म्हणाले की काही लोक मुद्दाम समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, मंत्री संजय बन्सोडे यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप करत म्हटलं की, “कुठल्याही कागदपत्राविना सर्टिफिकेट देऊन समाजातील इतर घटकांमध्ये फूट पाडण्याचं काम सुरू आहे.”
जरांगे पाटील पुन्हा कडाडले, सरकारला नवा इशारा काय?