बीड – बीड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा गरम झालं आहे. कारण ठरलंय – एक साधा बॅनर! होय, वडवणीमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर, ज्यामध्ये राज्याच्या अनेक बड्या नेत्यांचे फोटो झळकत आहेत… पण, आश्चर्य म्हणजे, या बॅनरवर धनंजय मुंडेंचा फोटो गायब आहे! आणि हीच बाब सध्या बीडपासून मुंबईपर्यंत चर्चा आणि राजकीय चर्चेचं केंद्रबिंदू बनली आहे.
नेते सगळे आहेत, पण मुंडे कुठे?
सदर बॅनरवर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, रुपाली चाकणकर यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचे मोठे फोटो झळकत आहेत. स्थानिक आमदार प्रकाश सोळंके देखील बॅनरमध्ये ठळकपणे आहेत. पण धनंजय मुंडे – ज्यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे (अजित पवार गट) बस्तान बसवले – त्यांचाच फोटो नाही!
राजकीय ‘संकतेचा’ इशारा?
गेल्या काही महिन्यांपासून मुंडे विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. कृषी खात्याचे पद हुकल्यापासून ते भ्रष्टाचाराच्या आरोपांपर्यंत अनेक झळा त्यांनी सोसल्या. आता या बॅनरवरील अनुपस्थितीमुळे, “मुंडे यांना साइडलाइन केलं जातंय का?”, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
पक्षात अंतर्गत धुसफूस?
राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांचा ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीत होणारा पक्षप्रवेश हा मोठा राजकीय इव्हेंट आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः येत आहेत. मात्र, या बॅनरवर मुंडेंचा फोटो न दिसणे, पक्षातील अंतर्गत गटबाजीचे लक्षण आहे का? अशी शंका निर्माण झाली आहे.
लोकांमध्ये चर्चांचा भडका
बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर आणि गावकऱ्यांमध्ये या बॅनरबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. “धनंजय मुंडेंना जाणूनबुजून डावललं का?”, “पक्षात त्यांचं स्थान डळमळीत झालंय का?”, अशा चर्चा सामान्य जनतेमध्ये रंगल्या आहेत.
राजकीय डावपेच की चूक?
हा बॅनर कोणी तयार केला, त्यामागचं नियोजन काय, आणि मुंडेंचा फोटो गायब ठेवण्यामागे हेतू होता की चूक? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण एका बॅनरने राज्याच्या राजकारणात नवा वादंग निर्माण केला आहे, हे नक्की!
एक फोटो, हजार प्रश्न!
धनंजय मुंडेंचा बॅनरवरून गैरहजेरी ही सामान्य घटना वाटत नाही. आगामी काळात यातून मोठे राजकीय बदल घडू शकतात. बीड जिल्ह्यातील या घडामोडीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.