तार कुंपणासाठी सरकारकडून ९०% अनुदान; अर्ज कसा करायचा, संपूर्ण माहिती वाचा

मुंबई | प्रतिनिधी

शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक योजना सरकारने सुरू केली आहे. शेतीला पाळीव व वन्य प्राण्यांपासून संरक्षण मिळावं यासाठी ‘तार कुंपण अनुदान योजना’ राबवली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ९०% पर्यंत अनुदान दिलं जातं. त्यामुळे पीकसंरक्षण होऊन शेतकऱ्यांचं नुकसान टळतं, उत्पन्नातही वाढ होते.

ही योजना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वन विकास प्राप्ती योजना (व्याघ्र प्रकल्प) अंतर्गत राबवली जाते.

योजनेचा उद्देश:

शेतकऱ्यांच्या पिकांचं जंगली डुकरं, हरणं, माकडं, गायी, शेळ्या यांसारख्या प्राण्यांपासून संरक्षण करणे हा मुख्य उद्देश आहे. काटेरी तारांचे कुंपण लावल्यास शेती सुरक्षित राहते. मात्र, अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींमुळे हे कुंपण बसवता येत नाही. त्यासाठीच ही योजना उपयुक्त ठरते.

कोण पात्र आहे?

ज्यांचं स्वतःचं शेतजमीन आहे. शेतजमिनीला वन्य प्राण्यांचा धोका आहे. शेतकरी योजनेच्या अटी पूर्ण करत असेल.

अर्ज प्रक्रिया:

संबंधित वन विभाग कार्यालय / कृषी विभाग / ग्रामपंचायतीकडे संपर्क साधा. ऑनलाइन अर्ज: https://mahaforest.gov.in/ या वेबसाइटवरून काही जिल्ह्यांमध्ये अर्ज शक्य आहे. कागदपत्रे: सातबारा उतारा जमीन नकाशा आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स फोटो शपथपत्र

किती अनुदान मिळतं?

एकूण खर्चाच्या ९०% पर्यंत अनुदान मिळू शकतं. उर्वरित १०% रक्कम शेतकऱ्यांना स्वतः भरावी लागते. कुंपणाचं काम पूर्ण झाल्यावर प्रत्यक्ष पाहणी होते आणि मग अनुदान खात्यात जमा केलं जातं.

अधिक माहिती कुठे मिळेल?

संबंधित ग्रामसेवक, तलाठी, वनविभाग अधिकारी, किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. जिल्हा अधिक्षक वनसंरक्षक कार्यालय किंवा पंचायत समितीकडे देखील माहिती मिळू शकते.

ही योजना शेतकऱ्यांच्या शेतीची सुरक्षा, उत्पन्नवाढ आणि मानसिक समाधान यासाठी महत्त्वाची आहे. ज्यांना गरज आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा.